दरवर्षी लाखो भारतीय अमेरिकेला काही ना काही कारणाने भेट देतात. काही जणं नातेवाईकांना भेटायला येतात तर काही जणं फिरायला येतात. काही जणं एखाद्या कार्यक्रमासाठी येतात तर काही जणं व्यवसाया निमित्ताने. अशी तात्पुरती भेट देणाऱ्या लोकांसाठी आरोग्य विमा हा अत्यंत महत्वाचा आहे. अमेरिकेतील दवाखाने, हॉस्पिटल्स, औषधं ही जगात सर्वात महागडी समजली जातात. एखादा साधा वाटणारा आजार किंवा हॉस्पिटलमधील किरकोळ ऊपचार ह्यांमध्ये प्रसंगी हजारो डॉलर्स खर्च होण्याची शक्यता असते, त्यामुळे अश्या प्रसंगी एखादा चांगला विमा उतरवलेला असणं हे अत्यंत आवश्यक असतं. आरोग्य विम्याशिवाय इथला खर्च हा भारतीयच नव्हे तर सर्वसामान्य अमेरिकी नागरिकांना देखील न परवडणारा आहे त्यामुळे कुठलाही धोका न पत्करता आरोग्य विमा काढणे हे अनिवार्य आहे.
अश्या तात्पुरत्या कालावधीच्या आरोग्य विम्याला “अभ्यागत आरोग्य विमा” (व्हिजिटर मेडिकल इन्शुरन्स) असं म्हटलं जातं.
विमा कुठून काढावा? भारत कि अमेरिका?
अनेक भारतीय आणि अमेरिकी विमा कंपन्यांकडून अश्या पद्धतीचा विमा खरेदी करता येऊ शकतो मात्र भारतीय विमा कंपनी कडून विमा खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा विचार करणं आवश्यक आहे. भारतीय कंपनीचा विमा हा भारतातील दवाखाने आणि हॉस्पिटल्स ह्यासाठी योग्य आहे पण अमेरिकेतील डॉक्टर्स, दवाखाने, किंवा हॉस्पिटल्स भारतीय कंपनीचा विमा स्वीकारण्याची शक्यता हि खूपच कमी असते त्यामुळे अमेरिकेतल्या उपचाराचा खर्च हा स्वतःच करून मग भारतात परतल्यावर त्या खर्चाचा दावा (क्लेम) भारतीय कंपनी कडे करावा लागतो. हि प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून त्यात वेळ जातो व मनस्ताप होण्याचीच शक्यता जास्त असते. दुसरं म्हणजे अमेरिकेतला खर्च स्वतःचा स्वतः करणं ह्यासाठी लाखो रुपये बरोबर घेऊन येणं आवश्यक असतं, ते देखील सर्वसामान्य माणसांसाठी कठीणंच. त्यामुळे उगाचच धोका न पत्करता अमेरिकी कंपनी कडून विमा खरेदी करणं हेच शहाणपणाचं ठरतं.
बऱ्याच वेळेला ट्रॅव्हल एजन्ट्स कुठला तरी विमा गळ्यात मारण्याचा प्रयत्नं करतात, त्यांना ना इथली आरोग्य प्रणाली माहित असते ना इन्शुरन्सचं ज्ञान. त्यामुळे अश्या कुठल्यातरी विमा एजन्टच्या भुलथापांना बळी न पडता अमेरिकी मान्यताप्राप्त विमा एजन्ट कडून विमा खरेदी करावा. स्वस्त हे योग्य असेलच असं नाही, स्वतः संशोधन करून निर्णय घ्या. अमेरिकेतील कुठल्याही मान्यताप्राप्त एजन्ट कडून खरेदी केलेल्या एकाच विमा योजनेची किंमत ही सर्वत्र सारखीच असते त्यामुळे फसवणुकीची शक्यता कमी असते व तुमच्या साठी योग्य असा विमा ते सुचवू शकतात. उदाहरणार्थ इन्सुबाय सारखी कंपनी.
इन्सुबाय हि गेली २० वर्षांहून अधिक काळ ग्राहकांना योग्य तो विमा घेण्यास मदत करते आहे. इन्सुबाय ह्या क्षेत्रातली सर्वात मोठी कंपनी असून ह्या कंपनीतील सर्व सल्लागार हे अत्यंत प्रशिक्षित, अनुभवी, आणि अमेरिकी इन्शुरन्स परवाना धारक (लायसन्स्ड एजन्ट्स) आहेत. ह्या कंपनीत ग्राहकाच्या गरजेनुसार योग्य तो विमा सुचवला जातो. ग्राहक स्वतः विविध प्रकारच्या विम्यांची ऑनलाईन तुलना करून योग्य तो विमा विकत घेऊ शकतो. इन्सुबाय.कॉम वर विमा खरेदी ची प्रक्रिया अत्यंत साधी, सोपी आणि जलद आहे. काही मिनिटातच विमा खरेदी ची प्रक्रिया पार पडून निश्चिन्त मनाने ग्राहक आपल्या पुढच्या तयारीला लागू शकतो. इन्सुबाय शी संपर्क साधण्याचा टोल फ्री क्रमांक आहे +१ (८६६) INSUBUY किंवा +१ (९७२) ९८५-४४००. व्हॉटसऍप: +१ (९७२) ७९५-११२३. आठवड्यातील सर्व सातही दिवस सल्लागार उपलब्ध.
विमा कधी काढावा? अमेरिकेला जायच्या आधि कि अमेरिकेला गेल्यावर?
विमा हा भारतातून प्रवास सुरु करायच्या आधि काढावा जेणेकरून प्रवासाचा कालावधी देखील विम्यामध्ये अंतर्भूत होईल. ह्याशिवाय मेरीलँड सारख्या काही राज्यांमध्ये काही असे नियम आहेत कि जे प्रवासी अभ्यागतांना आपल्या राज्यात विमा काढू देण्यास प्रतिबंध करतात. शिवाय एकदा का आपण आपल्या गंतव्यस्थानी पोचलो कि विम्या संदर्भात पुढे चालढकल करण्याचीच शक्यता अधिक असते, अश्या वेळी आजारी पडल्यानंतर ऐन वेळेस कुठलीही कंपनी विमा देत नाही, त्यामुळे शक्यतो विमा काढून मगच प्रवास सुरु करावा.
विमा वेगवेगळा काढावा कि एकच?
जर सर्व प्रवासी एकाच वेळी येऊन एकाच वेळी परत जाणार असतील तर एकच संयुक्त विमा काढावा. जर कोणी नंतर येणार असेल किंवा आधी जाणार असेल तर वेगवेगळा विमा काढावा. विमा संयुक्त काढला किंवा वेगवेगळा काढला तरी त्याची किंमत सारखीच राहते, प्रीमियम मध्ये काही फरक पडत नाही.
अभ्यागत आरोग्य विम्याचे प्रकार:
अभ्यागत आरोग्य विम्याचे अनेक पर्याय उपलब्ध असले तरी ढोबळ मानाने ते दोन प्रकारात मोडतात. (१) मर्यादित व्याप्ती (फिक्स्ड कव्हरेज) विमा, (२) व्यापक व्याप्ती (कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज) विमा.
- मर्यादित व्याप्ती (फिक्स्ड कव्हरेज) विमा:
ह्या प्रकारात समाविष्ट असलेल्या आरोग्य प्रक्रियांची (मेडिकल प्रोसिजर्स) ची कमाल किंमत हि आधीच निर्धारित केलेली असते. निर्धारित किमतीच्या वरील सर्व खर्च हा ग्राहकाला स्वतःचा स्वतः करावा लागतो. ह्या प्रकारच्या विम्याची किंमत हि तुलनेने कमी असली तरी त्यातून मिळणारे लाभही मर्यादित असतात. ह्या प्रकारातील मर्यादित लाभ आणि मर्यादित समावेश असलेल्या आरोग्य प्रक्रिया ह्यांचा विचार करता व्यापक व्याप्ती विमा (कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज) हा अधिकतर सुचवला जातो.
काही लोकप्रिय मर्यादित व्याप्ती (फिक्स्ड कव्हरेज) विमा योजना खालील प्रमाणे: - व्यापक व्याप्ती (कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज) विमा:
ह्या प्रकारच्या योजनां मध्ये सुरवातीची काही रक्कम (डीडक्टिबल) हि ग्राहकाला भरावी लागते त्यानंतर टप्प्या टप्प्यां मध्ये इन्शुरन्स कंपनी पॉलिसीच्या अधिकतम सीमा (पॉलिसी मॅक्सिमम) किंमतीतील ७५%, ८०%, ९०% ते १००% पर्यंत रक्कम अदा करते. अधिकतर योजना (प्लान्स) डीडक्टिबल नंतर १००% पर्यंत रक्कम अदा करतात.
व्यापक व्याप्ती (कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज) विमा हे अधिक सर्वमान्य असल्यामुळे बहुतांश डॉक्टर, दवाखाने, आणि हॉस्पिटल्स मध्ये स्वीकारले जातात. अश्या विम्यांचं एक पीपीओ नेटवर्क (प्रीफर्ड प्रोव्हायडर नेटवर्क) देखील असतं ज्यात भाग घेतलेल्या डॉक्टर, दवाखाने, फार्मसी, हॉस्पिटल्स ह्यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध असते. डॉक्टर्स व हॉस्पिटल्स थेट इन्शुरन्स कंपनीला बिल पाठवतात त्यामुळे रुग्णाचा उपचार हा कॅशलेस होतो आणि बऱ्याच वेळेला बिलामध्ये काही सूट देखील दिली जाते.
काही लोकप्रिय व्यापक व्याप्ती (कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज) प्लान्स खालील प्रमाणे:- ऍटलास अमेरिका
- पेट्रिअट अमेरिका प्लस
- सेफ ट्रॅव्हल्स यूएसए कॉम्प्रिहेन्सिव्ह
विशेष सूचना:
बऱ्याच कंपन्या ठराविक वयोमर्यादे च्या पुढे फक्त फिक्स्ड कव्हरेजच्याच योजना ऑफर करतात. जरी ते कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज म्हणत असले तरी त्यातल्या अटी व मिळणारे लाभ हे फिक्स्ड कव्हरेजचेच असतात त्यामुळे अश्या योजनांची योग्य ती खातरजमा करून घ्यावी.
जुने आजार (प्री एक्झिस्टिंग कंडीशन्स):
साधारणतः जुने आजार ज्यासाठी नियमित उपचार घ्यावे लागतात असे उपचार हे योजनेतुन वगळलेले असतात. अश्या उपचारांचा खर्च इन्शुरन्स कंपनी देत नाही परंतु अश्या आजारामुळे जर आपात्कालीन परिस्थिती (ऍक्यूट ऑनसेट ऑफ प्री एक्झिस्टिंग कंडीशन्स) निर्माण झाली तर बरेचसें प्लान्स ते कव्हर करतात.
काही उत्कृष्ट लोकप्रिय प्लान्स जे जुने आजार समाविष्ट करतात.
विमा खरेदी करण्याची प्रक्रिया:
विमा खरेदी करण्याची प्रक्रिया अतिशय साधी, सोपी, व जलद आहे. इन्सुबाय.कॉम वर जाऊन आपला अमेरिकेतील कालावधी व वय प्रविष्ट करावा. जे लागू प्लान्स समोर येतील त्यांचे लाभ, अटी, मर्यादा इत्यादींची तुलना करून त्यातील एका प्लान ची निवड करावी. निवडलेल्या प्लान वर क्लिक करून पुढील माहिती भरावी व शेवटी ऑनलाईन पेमेंट करून खरेदी प्रक्रिया पूर्ण करावी. विमा काढल्याची पावती लगेचच ऑनलाईन व ई-मेल वर मिळेल व विमा पॉलिसी चे कागदपत्र, ओळख पत्र (आयडी. कार्ड) इत्यादी ऑनलाईन (ईलेक्ट्रॉनिक) किंवा पोस्टाने आपण दिलेल्या पत्त्यावर येतील. कुठेही काही मदत लागल्यास इन्सुबाय च्या सल्लागारांशी फोन, ई-मेल, किंवा ऑनलाईन चॅट वर संपर्क साधावा. प्रवाश्यांची पूर्ण माहिती आणि क्रेडिट कार्ड उपलब्ध असल्यास ५ मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
अधिक माहिती करीत इन्सुबाय.कॉम शी संपर्क साधावा…